कांदा निर्यात बंदीचा निषेध

    दिनांक :16-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. या निर्णयाचा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. जगभरात टाळेबंदी असताना कष्टाने शेतकर्‍यांनी कांद्याचे उत्पन्न घेतले. कांद्याला आता चांगला भाव मिळू लागला. चार पैसे पदरात पडतील, अशी आशा शेतकर्‍यांना होती. पण, केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर केली. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे.
 
 
kanda_1  H x W:
 
कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात यावी, शेतकर्‍यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, अल्पसंख्याक अध्यक्ष सुलेमान अली, राजेश अडूर, महिला शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, किशोर आवळे, अनिल भोयर, कुणाल रामटेके आदींची उपस्थिती होती.