शुक्रवार ते रविवार समुद्रपूर येथे जनता कर्फ्यू

    दिनांक :16-Sep-2020
|
समुद्रपूर,
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामूळे समुद्रपूर येथे वाढत असलेल्या रुग्णांना विचारात घेत उपाय योजनांसाठी नगराध्यक्ष गजानन राऊत यांनी व नगरपंचायतने 15 रोजी सभा घेतली. यावेळी नायब तहसीलदार के. डी. किरसान, ठानेदार हेमंत चांदेवार आणि व्यापारी असोशियेशन यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल, यावर चर्चा करून 18 , 19 , 20 रोजी जनता कर्फ्यू करून बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून तर शुक्रवार पर्यत 9 ते 5 वाजेपर्यत सर्व दुकाने सुरू राहील. मात्र शनिवार 26, आणि रविवार 27 रोजी पासून एक महिना शनिवार, रविवार रोजी बाजार पेठ बंद राहील.
 
 
lock_1  H x W:
 
सदर बैठकीकरिता व्यापारी एसोशियेशनचे अध्यक्ष शांतिलाल गांधी, उपनगराध्यक्ष वर्षा बाभुळकर , विरोधी गटनेता मधुकर कामडी, माजी नगराध्यक्ष शिला सोनारे , नगरसेवक प्रविण चौधरी, रामचंद्र कडू, राजू बेहरे, गनेश अग्रवाल,विठ्ठल झाडे, पांडुरंग बाभुळकर, आदींची उपस्थिती होती. जनता कर्फ्यू मध्ये दूध विक्री करिता सकाळी 7 ते 10 वाजे पर्यत सुट दिली आहे. जीवनावश्यक वस्तू, मेडिकल दुकान, दवाखाने सुरू राहील.