वर्ध्यात कोरोनाचे ६ पोलिसांसह ११५ नवे रूग्ण

    दिनांक :17-Sep-2020
|
- ५ रुग्णांचा मृत्यू
तभा वृत्तसेवा
वर्धा,
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या वाढतच आहे. आज गुरुवार १७ रोजी ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ७२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे मृतकांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. आज जिल्ह्यात ११५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. जांब पोलिस स्टेशन येथे ६ पोलिस कोरोना बाधित झाले आहेत.
 
corona_1  H x W 
 
जिल्ह्यात वर्धा तालुक्यात ६८ रूग्णांमध्ये ३८ पुरूष व ३० महिलांचा समावेश आहे. देवळी तालुक्यात ७ रूग्णांमध्ये ३ पुरूष व ४ महिलांचा समावेश आहे. सेलू येथील ५ रूग्णांमध्ये २पुरुष व ३ महिला आहेत. आर्वी ३, कारंजा १ पुरुष.आष्टीत ६ रुग्णांमध्ये ३ पुरुष व ३ महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. समुद्रपूर तालुक्यात ११ रूग्णांमध्ये ९ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्यात १४ रूग्णांमध्ये ९ पुरूष व ५ महिलांचा समावेश आहे. एकूण ११५ रूग्णांमध्ये ६६ पुरूष व ४९ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर जिल्ह्यातील २९८८ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे. यातील १४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.