नागपुरात आज 1717 नव्या रुग्णांची भर

    दिनांक :17-Sep-2020
|
नागपूर,
नागपुरात कोरोना संसर्गाने अक्राळ रूप धारण केले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 58 हजारांवर गेला आहे. तसेच आजवर अठराशे रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. आज गुरुवारी शहरासह जिल्ह्यात 1445 बाधित बरे होऊन घरी परतले. तर आज 1717 नवीन रुग्णांची भर पडली आहे.
 
corona_1  H x W 
 
आतापर्यंत शहरासह जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णाची संख्या 58 हजार 890 झाली आहे. त्यापैकी 45 हजार 372 रुग्ण बरे होऊन परतलेले आहेत. आज गुरुवारी 64 रुग्ण कोरोनाने मरण पावले असून मृत्यू कमी होण्याऐवजी संख्या दिवसागणित वाढतच चालली आहे. त्यापैकी 4 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11 हजार 639 असून त्यापैकी 5906 गृह विलगिकरणात आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77. 05 टक्के आहे.