अकोल्यात आढळले १९६ बाधित, चौघांचा मृत्यू

    दिनांक :17-Sep-2020
|
- एकूण चाचणीत ६० टक्के बाधित
अकोला,
जिल्ह्यात गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी १९६ जण बाधित आढळले.तर चार जणांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे 328 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 196 अहवाल बाधित आढळले. एकूण तपासणीत बाधित आढळलेल्यांचे प्रमाण ५९.७५ टक्के इतके आहे.बाधित आढळण्याच्या वाढलेल्या टक्केवारी मुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.क्रियाशील बाधितांची टक्केवारी २२.२९ तर मृत्यू दर ३.१८ इतका आहे.यासर्व आकडेवारीत उपचारानंतर ७४.५२ टक्के रुग्णांनी कोरोनावर केलेली मात ही दिलासादायक बाब आहे.
 
corona_1  H x W 
दरम्यान आज दिवसभरात १९६ जणांचे अहवाल बाधित आढळले त्यात मोठी उमरी येथील अकरा जण, कोलखेड येथील दहा जण, गौरक्षण रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी नऊ जण, आदर्श कॉलनी, रणपिसे नगर, जूने शहर येथील आठ जण, डाबकी रोड, लहान उमरी येथील प्रत्येकी सात जण, शास्त्री नगर, तोष्णीवाल लेआऊट व साहूरा हॉस्पीटल जवळ येथील प्रत्येकी सहा जण,तापडीया नगर येथील पाच जण, जठारपेठ व खेडकर नगर येथील चार जण, चिंचोली रुद्रायणी ता. बार्शीटाकळी, खडकी, चोट्टाबाजार,तारफैल,शिवणी, तेल्हारा, मलकापूर, दुर्गा चौक, तुकाराम चौक, बाळापूर नाका, जिल्हा परिषद कॉलनी, अमृतवाडी ता. मुर्तिजापूर, धाबा व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कच्ची खोली, खोलेश्वर, न्यु खेतान नगर, देवराबाबा चौक, अकोट फैल, आपातापा, सोनाला, सानवी पेठकर रोड, बाळापूर, वाशिम बायपास, रुहीखेड ता. अकोट, दांळवी, गोयका लेआऊट, घाटे हॉस्पीटल, जवाहर नगर, पत्रकार कॉलनी, भागवत वाडी, वृंदावन नगर, रविनगर, अकोट, बार्शीटाकळी, बोरगाव मंजू, रामदास पेठ, पिकेव्ही, कोलसा, दहिहांडा, जेतवन नगर व मुझीफ्फर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. देशमुख पेठ लोहार गल्ली येथील सहा जण, डाबकी रोड, जीएमसी व जागृती विद्यालय येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ, चिंतामणी नगर, पारस व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित एलएच क्वॉटर, सिंधी कॅम्प, अकोट फैल, गौरक्षण रोड, रामदास पेठ, खडकी, भावसिंग सोसायटी व शनिवार पेठ अंजनगाव सूर्जी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत
दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात रणपिसे नगर, अकोला येथील 51 वर्षीय पुरुष, पांटोडा, येथील 55 वर्षीय महिला ,शिवनी येथील 65 वर्षीय पुरुष तर रणपिसे नगर, येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गुरुवारी एकूण 103 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत एकूण बाधित रुग्ण संख्या ६१६३ वर पोहचली असून १३७४ क्रियाशील बधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.