भंडाऱ्यात आज विक्रमी 291 पॉझिटिव्ह

    दिनांक :17-Sep-2020
|
- 101 रूग्णांना डिस्चार्ज
- आज 03 मृत्यू
भंडारा,
जिल्ह्यात आज विक्रमी 291कोरोनाबाधित रुग्णआढळले असून 101रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2047 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3478 झाली आहे.
 
corona_1  H x W 
 
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 204, साकोली 10, लाखांदूर 07, तुमसर 19, मोहाडी 23, पवनी 12 व लाखनी तालुक्यातील 16 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2047 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 3478 झाली असून 1357 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 03 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 74 झाली आहे.
 
 
आज 17 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 177 व्यक्ती भरती असून 1760 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.