गडचिरोलीत आज ५९ नवीन बाधितांची भर

    दिनांक :17-Sep-2020
|
- २८ जणांची कोरोनावर मात
गडचिरोली,
जिल्हयात आज पुन्हा ५९ जण नव्याने कोरोना बाधित आढळून आले. यात गडचिरोलीच्या २१ जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात भामरागड २, वडसा ६, चामोर्शी ११, अहेरी ६, आरमोरी, धानोरा, सिरोंचा व मुलचेरा प्रत्येकी ३-३ असे मिळून आज ५९ जण कोरोना बाधित आढळून आले. तर आज २८ जण कोरोनामुक्त झाले. यात गडचिरोली १४, चामोर्शी व कुरखेडा एक एक, वडसा ४, मुलचेरा २, कोरची व आरमोरी प्रत्येकी ३-३ जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्हयातील सक्रिय बाधितांची संख्या ५३७ झाली तर कोरोनामुक्त रूग्णांची संख्या १२९७ झाली. आत्तापर्यंत एकूण कोरोना बाधित १८४१ पैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona_1  H x W 
 
नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोलीमधील २१ जणांमध्ये नवेगाव २, कोटगल १, अभ्यादान इमारत पोलीस संकूल १, तहसिल कार्यालय १,पोलीस कॉलनी ५, गोकुळनगर १, मच्छीमार्केट १, आयटीआय चौक १, जिल्हा परिषद कॉलनी १, पंचवटी नगर आयटीआय २, मुरखळा १, साईनगर १, रामपुटी नगर एमआयडीसी रस्ता १, सी ६० जवान १ व गांधी वार्ड १ यांचा समावेश आहे. भामरागड येथील २ जणांमध्ये नागपूर हून आलेला १ व इतर रूग्णाच्या संपर्कातील, मुलचेरा श्रीनगर येथील ३ जण, वडसा मधील ६ जणांमध्ये २ सीआरपीएफ, २ आमगाव, कोकडीचा १, वडसा शहर १ यांचा समावेश आहे. चामोर्शी मधील ११ मध्ये शारदा राईस मील ४, आष्टी ४, चामोर्शी २ व येणापूर १ यांचा समावेश आहे. आरमोरी ३ मध्ये वडधा २ व आरमोरी शहरातील १ नागपूर हून आलेला बाधित आढळून आला. अहेरी ६ जणांमध्ये नागेपल्ली २,अहेरी ३ व आलापल्ली १ जणांचा समावेश आहे. धानोरा ३ मध्ये मुरूमगाव येथील सर्व तर सिरोंचा येथील ३ मध्ये सर्व मंचेरीयाल हून आलेले बाधित आढळून आले.