बुलडाण्यात 607 कोरोना अहवाल निगेटिव्ह; तर 112 पॉझिटिव्ह

    दिनांक :17-Sep-2020
|
- 106 रूग्णांना मिळाली सुटी
बुलडाणा,
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 719 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 607 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 112 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 89 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 169 तर रॅपिड टेस्टमधील 438 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 607 अहवाल निगेटीव्ह आहेत.
 
corona_1  H x W 
 
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 7, खामगांव शहर : 15, शेगांव शहर : 18, दे.राजा शहर : 7, दे. राजा तालुका : कुंभरी 1, दे. मही 3, गरगुंडी 1, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : धाड 1, साखळी 1, मोताळा तालुका : मकोडी 1, टाकळी 1, मेहकर तालुका : नायगाव दत्तापुर 1, नांदुरा शहर : 8, लोणार शहर : 3, लोणार तालुका : चिंचोली 2, दहिफळ 1, पांग्रा डोळे 1, गायखेड 2, उदानपुर 3, बाभुळखेड 1, किन्ही 3, बिबी 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, वाघाळा 1, हिवरखेड पूर्णा 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : सावरखेड 1, नांदुरा तालुका: टकरखेड 1, निमगाव 2, दादगाव 1, बेलुरा 1, मलकापूर तालुका: देवधाबा 1, भान गुरा 1, सिंदखेड राजा शहर : 1, मूळ पत्ता डोंगरगाव ता. बाळापूर जि. अकोला 1, कौलखेड अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 112 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 106 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
 
 
सुटी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार बरे होवून सोडलेले रूग्ण खामगांव : 37, जळगांव जामोद : 8, शेगांव : 8, मलकापूर : 7, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 15, अपंग विद्यालय 1, स्त्री रुग्णालय 1, चिखली : 4, नांदुरा : 3, दे. राजा : 14, लोणार : 3, सग्रामपूर 5. तसेच आजपर्यंत 25101 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4337 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4337 आहे.
 
 
आज रोजी 1752 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 25101 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5504 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4337 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1098 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.