975 शेतकर्‍यांना मिळाले 11 कोटीचे पीककर्ज

    दिनांक :17-Sep-2020
|
- कोरा येथील महाराष्ट्र बँकेची कामगिरी, खातेदाराला दिलासा
समुद्रपूर,
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पीक कर्ज प्रकरणी होत असलेला शेतकर्‍यांना नाहक त्रासाविषयी प्रशासनाकडे तक्रार केल्यावर शाखा व्यवस्थापकाची उचल बांगडी करण्यात आली. नव्याने रुजू झालेल्या शाखाधिकारी आणि कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांचे पीक कर्ज निकाली काढून तब्बल 957 खातेदारांना पीक कर्जासाठी 11 कोटी 84 लाख रुपये उच्चाकिंत कर्जपुरवठा केल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
 
 
bom_1  H x W: 0
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भौतिक दूरता राखून 250 खातेदारांना 80 लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. तालुका स्थरावर देखील एवढ्या मोठया प्रमाणात पीक कर्ज पुरवठा कुठल्याही बँकेला केले नाही. या बँकेत अकराशे शेतकर्‍यांचे खाते आहे. यापैकी 957 खातेदारांना पीक कर्ज वाटप केले असून पीक करण्याचे कार्य सुरू असून कोरोनाच्या अडचणीत शेती व्यवस्थेला आर्थिक हातभार लागला आहे. यामुळे शेतकर्‍यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. बँकेचा शाखा व्यवस्थापक रंजना चोपडे, कर्मचारी रोशन झाडे, आनंद जहागीरदार, मितेश कारमोडे, अमोल वैरागडे परिश्रम घेत आहे.