सुशांत प्रकरणातील धारणी कनेक्शन पुन्हा चर्चेत

    दिनांक :17-Sep-2020
|
- इम्तियाज खत्री एनसीबीच्या रडारवर
तभा वृत्तसेवा
धारणी,
सध्या देशभरातील मिडीयात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या दिशा व सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात दर तासाला नवनवीन खुलासे होत आहेत. 8 जूनच्या ड्रग्स पार्टीत एका कंत्राटदाराचे नाव येताच अमरावती जिल्ह्यासह मेळघाटात एकच खमंग चर्चेला सुरुवात झालेली आहे. सुशांतसिंग सोबत सावली सारखा चिपकून राहणारा व रिमोट करणार्‍या इम्तियाज खत्री आता एनसीबीच्या रडारवर आल्याने तो अमरावती जिल्ह्याची शरण घेऊ शकतो कारण जुलै-ऑगस्ट महिन्यात खत्री धारणीच्या गडगा प्रकल्पावर येऊन थांबल्याची माहिती आहे.
 
 
sushant_1  H x
 
सुशांतसिंगच्या मृत्यू विषयी सीबीआयची चौकशी सुरु होण्यापूर्वीच गडगा मध्यम प्रकल्प तालुका धारणीच्या ठेकेदाराचा पुत्र इम्तियाज पोलिस बंदोबस्तात अनेकदा डॅम साईटवर येऊन मुक्कामी राहलेला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसचा गार्ड सुध्दा त्याच्या सेवेत होता. अनेक चॅनलवर इम्तियाजचे नाव घेण्यात आल्यापासून तो मुंबईत नाही. अमरावती जिल्ह्यात गडगा प्रकल्प, वरुड येथील पंढरी प्रकल्प तथा अचलपूर येथील वासनी खुर्द आणि चांदूर रेल्वेच्या सोनगाव शिवणी सिंचन प्रकल्पाचे काम एकाच कंत्राटदाराकडे असून मुंबईतून बेपत्ता झाल्यास खत्री अमरावती जिल्ह्यात शरण घेऊ शकतो. कारण की 26 जुलै रोजी तो धारणीच्या गडगा प्रकल्पावर फिल्मी मित्रांबरोबर येऊन थांबलेला होता, हे विशेष.
 
 
 
सुशांतसिंग मृत्यू प्रकरण आता ड्रग माफियापर्यंत पोहचल्याने तथा मॅनेजर दिशाची मर्डर मिस्ट्री सुरु झाल्यावर 8 जूनच्या ड्रग्स पार्टीतील लोकांना एनसीबीने रडारवर घेतलेले आहे. या पार्टीत कंत्राटदार म्हणून जो उल्लेख मिडीयावर वारंवार होत आहे, तो सुशांतसिंगचा परममित्र इम्तियाज खत्री असण्याच्या शक्यतेप्रमाणे एनसीबीचा तपास सुरु झालेला आहे. तो कंत्राटदार पुत्र इम्तियाज निघाल्यास काही नवल होणार नाही. मात्र एनसीबीच्या कारवाईतून पाय मागे घेण्यासाठी तो अमरावती जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता आहे. सीबीआयच्या ताब्यात असलेली रिया चक्रवर्ती, बेपत्ता रोहन रॉय आणि इम्तियाज हे सुशांतसिंग राजपूतचे जिवलग मित्र होते. सुशांतचा अकाली जीव गेला असल्याने मित्रांच्या विरोधात चौकशी सुरु झालेली असून एनसीबी लवकरच इम्तियाजची शोध मोहिम हाती घेण्याची शक्यता आहे. सुशांतसिंग प्रकरणी धारणी कनेक्शन एकदा तरी उजेडात येईल, असे वाटत आहे.