वाशीम जिल्ह्यात आणखी 103 कोरोना बाधित

    दिनांक :17-Sep-2020
|
वाशीम,
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी एकूण 103 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 3144 वर पोहचली आहे. याच दरम्यान आययुडीपी कॉलनी वाशीम येथील 72 वर्षीय एका रुग्णाचा मृत्यू झाला.
 
 
corona_1  H x W
 
प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील 4, देवपेठ येथील 1, राधाकृष्ण नगर परिसरातील 2, रेल्वे कॉलनी परिसरातील 3, काटीवेस परिसरातील 1, महात्मा फुले चौक परिसरातील 8, नंदीपेठ येथील 1, योजना कॉलनी परिसरातील 1, अकोला नाका परिसरातील 1, आययुडीपी परिसरातील 1, काळे फाईल येथील 2, पुसद नाका परिसरातील 1, नगरपरिषद परिसरातील 1, शुक्रवार पेठ येथील 4, लहूजी नगर येथील 1, लाखाळा परिसरातील 3, शिव चौक येथील 3, चामुंडादेवी परिसरातील 1, स्वराज कॉलनी परिसरातील 1, चंडिकावेस परिसरातील 1, टो येथील 1, विळेगाव येथील 1, तामसी येथील 1, सावरगाव येथील 4, शिरपुटी येथील 7, काटा येथील 4, सावरगाव जिरे येथील 3, मानोरा शहरातील 1, रिसोड शहरातील आंबेडकर नगर येथील 1, समर्थनगर येथील 3, पंचवटकर गल्ली येथील 2, विठ्ठल रेसिडेन्सी परिसरातील 1, लोणी फाटा येथील 1, महागाव येथील 1, वनोजा येथील 1, कोयाळी येथील 1, शेलू खडसे येथील 1, पळसखेड येथील 3, गणेशपूर येथील 1, भरजहांगीर येथील 1, मालेगाव शहरातील 7, टाकळी येथील 1, एरंडा येथील 1, मंगरूळपीर शहरातील 1, शेलूबाजार येथील 1, आसेगाव येथील 1, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील 2, वेदांतनगर येथील 2, वाल्मिकी नगर येथील 1, रविदास नगर येथील 1, ममता नगर येथील 1, पोहा येथील 1, गायवळ येथील 1, खानापूर येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात उपचार घेणार्‍या 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तसेच. जिल्हा कोविड रुग्णालय येथे 11 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या वाशीम शहरातील आययुडीपी येथील 72 वर्षीय व्यक्तीचा काल, 15 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 3144 झाली असून, त्यात 862 सकारात्मक रुग्ण असून, मृतकाची संख्या 56 झाली आहे.