पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त नवेगाव बांध येथे रक्तदान शिबीर

    दिनांक :17-Sep-2020
|
नवेगाव बांध,
नवेगाव बांध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त तसेच भारतीय जनता पक्ष अर्जुनी मोरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात 'सेवा सप्ताह' अंतर्गत ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे जिवनज्योती रक्तपेढी यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात ७० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
blood donation_1 &nb
 
यावेळी प्रदेश सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, रघुनाथ लांजेवार, तालुका महामंत्री नुतन सोनवाने, विजया कापगते, शितल राऊत, खुशाल काशिवार, अन्ना पाटिल डोंगरवार, महादेव बोरकर, व्यंकट खोब्रागडे, विनोद नाकाडे उपस्थित होते व युवा मोर्चा अर्जुनी मोर अध्यक्ष विवेक खंडाईत, संदीप कापगते, होमराज पुस्तोडे, दिपकर उके, सतिश कोसरकर, बाळु डोंगरवार आदींनी उपस्थित राहून रक्तदान शिबीर यशस्वी केले.