ग्रामसेवकावर कार्यवाही न केल्यास सामूहिक राजीनामे

    दिनांक :17-Sep-2020
|
- शैलेश अग्रवाल यांची माहिती
- नेरी पुनर्वसन ग्रापंच्या ग्रामसेवकाचा भोंगळ कारभार
तभा वृत्तसेवा
आर्वी,
ग्राम पंचायत नेरी पुनर्वसन या गावामध्ये १५ वर्षांपासून ग्रामपंचायत नव्हती. त्यामुळे गावातील या पहिल्या ग्राम पंचायतीकडून लोकांना विकासाची बरीच अपेक्षा आहे. प्रकल्पात सर्वकाही गमावल्यावर निकृष्ट दर्जाची कामे झालेल्या पूणर्वसन वसाहतीत नव्याने संसार सावरतांना गतीमान विकासाच्या अपेक्षेतून सरपंचासह जवळपास सर्वच युवा व होतकरू सदस्य ग्रामस्थांनी निवडून दिले. मात्र अकार्यक्षम व भ्रष्ट ग्रामसेवक कांबळेच्या नेमणुकीमूळे ग्रामपंचायतच नव्हे तर संपूर्ण गाव त्रस्त आहे. ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा सरपंच्यासह सर्व सदस्य राजीनामे देतील, असे एकच मिशन शेतकरी मिशनचे प्रेरक शैलेश अग्रवाल यांनी कळवले आहे.
 
agraval_1  H x  
 
सरपंच व सदस्यांनी अनेक वेळा समज देऊनही कांबळे प्रशासकीय व शासकीय काम योग्य प्रकारे करत नसल्याचे, आरोग्य विषयक उपाय योजनांमध्ये दुर्लक्ष करण्याचे, कॅश बुक अपडेट ठेवत नसल्याचे, गावतील कर जमा करून स्वतः वापरत आर्थिक अपहाराचे, ग्रामपंचायती मध्ये हाजर राहत नसल्याचे, पंचायत समिती किवा ग्राम पंचायतीच्या मीटिंगला गैरहाजर राहत असल्याचे आरोप करत सरपंच धनराज टूले यांच्यासह सर्व सदस्यांनी ग्रामसेवक बदलून देन्यासाठी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. ग्रामसेवक कांबळेची तक्रार ७ जून पासून वेळोवेळी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी वर्धा, यांच्याकडे देन्यात आली असूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. १६ रोजी सर्व सदस्यांनी सरपंचासह पुन्हा तक्रार दिली असून ८ दिवसात कार्यवाही न केल्यास सरपंचासह सर्व सदस्यांनी सामूहिक राजीनामा देनार असल्याचे कळविले आहे.