अफवांवर विश्वास ठेवू नका, जनता कर्फ्यु कायम

    दिनांक :17-Sep-2020
|
- पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे
बुलढाणा,
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारा पार गेली असून अशीच परिस्थिती राहिल्यास सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजरांचा आकडा पार करण्याची शक्यता आयसीएमआरने व्यक्त केली आहे. म्हणूनच 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत यावर विस्तृत अशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात कडक असा जनता कर्फ्यु लावावा, अशी मागणी केली. सोबतच अनेकांनी देखील अशीच मागणी केली.
 
dr shingane_1   
 
जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांनी तर 21 दिवसाचा लॉकडाऊन केल्याशिवाय ही परिस्थिती नियंत्रणात येणार नाही कारण जनता कुठल्याच नियमाचे पालन करत नाही असे संकेत त्यांनी दिले. पत्रकार बांधवांना देखील याबाबत विचारणा करण्यात आली, त्यांनी देखील हेच मत व्यक्त केले. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राबवित असतांना प्रत्येक नागरिक घरी उपस्थित असणे गरजेचे आहे. म्हणूनच जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी जिल्ह्यात 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. परंतु काही खोडसर व्यक्तींनी खोडसाळपणा करत मा पालकमंत्र्यांच्या नावाने खोटा मॅसेज तयार करून समाज माध्यमातून व्हायरल केला आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. ज्या कोणी हा मॅसेज व्हायरल केला आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे तो फेक मॅसेज कोणीही व्हायरल करू नये असे आवाहन करण्यात येते. तसेच पालकमंत्री महोदयांनी 15 सप्टेंबर रोजी जाहीर केलेला जनता कर्फ्युचा निर्णय आजही कायम आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.