अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाची कारवाई

    दिनांक :17-Sep-2020
|
गोंदिया,
सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा व पांढरी परिसरामध्ये सध्या अवैध रेतीची वाहतूक मोठ्य जोमात सुरू आहे. तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने अवैध रेती चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 
tractor_1  H x  
 
आज गुरुवारी वनविभागाच्या गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाचे चिरचाडी (डोंगरगाव) येथील नाल्यामधून ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३५-ए.जी. ८३८१ लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैध रेती भरुन घटेगाव-शिवनटोला (पांढरी) रस्त्याने भरधाव वेगाने पांढरीच्या दिशेने जात असल्याची वनविभागाला माहिती मिळाली. घटेगाव येथील वनरक्षक स्वप्नील डोंगरे, वनरक्षक आनंद बंसोड आणि वनरक्षक दिपक बोदलकर यांनी अवैध वाहतूक करत असलेल्या रेतीचा ट्रॅक्टर पकडून कोहमारा वनविभागाचे कार्यालयात जमा केलेला आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी आर.डी.पंचभाई, सहायक वनसंरक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. सदर ट्रॅक्टरचा मालक कोहळीटोला येथील डी.पी.खोटेले असून ट्रॅक्टर चालक धनंजय प्रेमलाल ब्राम्हणकर आहे.