पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्या

    दिनांक :17-Sep-2020
|
- भारतीय जनता पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन
पातूर,
तालुक्यातील जवळपास 19 गावांमध्ये 13 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी अतीवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस होऊन अनेक गावात शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन भाजपाने येथील तहसीलदारांना दिले आहे.
 
 
patur_1  H x W:
 
पातूर तालुक्यातील चारमोळी, चोंढी, सावरगाव, अंधार सांगवी, उमरापांगरा, राहेर, अडगाव, पिंपळडोळी, नवेगाव, जाम पाचरण, पांढुर्णा, झरंडी, पिंपळखुटा आदींसह 19 गावामध्ये भयंकर झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले, ही एक प्रकारे ढगफुटीच होती. काही शेतामध्ये उभ्या पिकासह सुपीक माती सुद्धा खरडून गेली.
 
 
 
तसेच काही गावामध्ये घरांची प्रचंड पडझड झाली, काही कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले, तसेच शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावल्या गेला. येथे कर्जमाफीची प्रक्रिया अर्धवट झालेली आहे, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचे व मजुरांचे शेताचे घराचे व खरडून गेलेल्या शेतीचे सर्वेक्षण तत्काळ करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे.
 
 
 
मागणीचे निवेदन तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार सै. ऐहेसानोद्दीन यांना देण्यात आले. निवेदनावर तालुका अध्यक्ष रमण जैन, विजयसिंह गहिलोत, चंद्रकांत अंधारे, राजू उगले, अभिजित गहिलोत, कपील खरप, श्रीकांत बराटे, गजानन निमकाळे, विनेश चव्हाण, संजय फाटकर, सचिन बारोकार, सचिन बायस, श्रीकृष्ण लठाळ यांच्यासह अनेक कार्यकत्यार्ंच्या सह्या आहेत.