कोरोनाच्या मृत्युदराबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    दिनांक :17-Sep-2020
|
 - महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
नागपूर,
नागपूर शहरातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी समन्वय समिती गठीत केली.
 

court_1  H x W:
 
कोरोनाबाधितांना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध केल्या जात नसल्याची गंभीरतेने दखल घेत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी आज गुरुवारी झालेल्या न्यायालयाने हा निर्णय घेतला. या समन्वय समितीमध्ये विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त अथवा त्यांचे प्रतिनिधी, आएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांचा समावेश केला आहे. समितीची बैठक शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी महापौरांच्या कक्षात सकाळी ११ वाजता होईल.
 
 
तर सुनावणीदरम्यान, महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी करोनासाठी कंट्रोल रूम स्थापन केल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याचे नोटिफिकेशन लवकरच काढणार आहे. यावर कोणत्याही रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही याची खातरजमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तर शहरात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा नाही, अशी औषध पुरवठा विभागाने हमी दिली.