दारू विक्रेता युवतींची पोलिसांनाच जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :17-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
मिळालेल्या माहितीनुसार, दारुविक्रेत्या महिलेकडे धाड घातली असता सराइत दारुविक्रेती तसेच तिच्या तरुण मुलीने पोलिसांना धमकावित अंगावर धावून जात अश्लील शिवीगाळ करीत विळीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील संत तुकडोजी वार्ड येथे घडला.
 
daru_1  H x W:  
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकडोजी वार्ड येथे अंजु राजू येळणे (४७) ही महिला अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला पोलिस माला मैंद यांच्यासह पीएसआय आगाशे, पोलिस हवालदार हमीद शेख, संदीप उईके पोलिस चमु घटनास्थळी पोचली. संत तुकडोजी वार्ड येथील अंजु राजु येळणे हिला तीचे निवासस्थानी देशी दारू विक्री करताना रंगेहाथ पकडले.
 
निवासस्थानाचे परिसरात एका कापडी पिशवीत देशी दारूने भरलेल्या काचेच्या १८० एमएमच्या २० बाटल्या मिळाल्या. यावरून अंजु येळणे हिला पुढील कार्यवाहीकरीता महिला पोलिस कर्मचारी यांचे मदतीने ताब्यात घेतले असता दारू विक्रेता महिलेची मुलगी काजल ही धावत आरोपी महीलेजवळ आली व दोघी मायलेकिंनी गोंधळ घालुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुद्देमाल हिसकावून घेऊन घराशेजारी असलेल्या नाल्यात टाकून दिला. तसेच काजल येळणे हिने यापुर्वी पेटवून घेतले होते. यानंतर जर माझ्या घरी आलात, तर तुमच्या नावाने खोटी चिट्ठी लिहून परत एकदा पेटवून घेईल, अशी धमकी देत धारदार पावशी घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेली. आईला जर तुम्ही पोलिस स्टेशनला घेउन गेलात तर जिवानीशी ठार मारण्याची धमकीसुद्धा पोलिसांना दिली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेत गुन्ह्याची नोंद केली असून हिंगणघाट पोलिस पुढील तपास करीत आहेत.