अमरावतीत कोरोनाग्रस्त दहा हजार पार

    दिनांक :17-Sep-2020
|
- गुरूवारी 430 बाधित, 1 मृत्यू, 297 मुक्त
तभा वृत्तसेवा
अमरावती,
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दहा हजार पार झाली झाली आहे. गुरूवारी पुन्हा 1 रुग्णांचा मृत्यू झाला तर 430 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 297 कोरोनामुक्त झाले आहे.
 
amravati_1  H x 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 103 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 2189 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 10 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले तर 591 गृह विलगिकरणात आहे. आजपर्यंत 7695 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दर्यापूर येथील 47 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अमरावती शहरातील विलास नगर, नवाथे नगर, पुजा कॉलनी, श्याम नगर, पटवीपुरा, यशोदा नगर, टोपे नगर, बापू कॉलनी, मोहन कॉलनी, प्रभा कॉलनी, चैतन्य कॉलनी, योगायोग कॉलनी, अप्पर वर्धा कॉलनी, प्रशांत नगर, जुनीवस्ती बडनेरा, सिद्धी कॉलनी, श्रद्धा कॉलनी, साई नगर, गाडगे नगर, मधुबन कॉलनी, गोपाल नगर व अन्य भागातील तसेच ग्रामीण परिसरातील चांदुर रेल्वे, तिवसा, वरूड, वलगाव, अंजनगाव सुर्जी, भातकुली, परतवाडा, अचलपूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, चांदूर रेल्वे, आष्टी, पूर्णा नगर, कांडली, मिर्झापूर, नांदगाव खंडेश्वर, नेरपिंगळाईसह अन्य ठिकाणचे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. या नवीन 430 बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
 
नियमांचे पालन करा
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या सुचना व उपायोजना करण्यात आल्या आहे, त्याचे पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त आरती सिंग, पोलिस अधिक्षक हरीबाजाली यांनी केले आहे. मुखाच्छादन लावणे, भौतीक अंतर पाळणे, गर्दी न करणे यासारख्य अन्य सुचनांचे पालन नागरिकांनी न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.