अकोल्यात 'नो मास्क नो पेट्रोल-डिझेल' उपक्रम

    दिनांक :17-Sep-2020
|
अकोला,
अकोला शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन केले आहे व काही मार्गदर्शक तत्वे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी परस्पर अंतर पाळून मास्क परिधान करणे हे होय. पण, बरेच नागरिक मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी वावरताना दिसतात. पोलिस प्रशासन मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करतातच. परंतु, पोलिसांना इतरही अनेक कामे असल्याने पोलिसांची नजर चुकवून बरेच नागरिक मास्क न घालण्यातच धन्यता मानतात.
 
mask_1  H x W:
 
यासाठी लोकसहभाग व जनजागृती करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे वाशिम अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि शहर वाहतूक पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी पुढाकार घेऊन गुरुवारपासून अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपावर 'नो मास्क नो डिझेल' या मोहिमेची सुरवात केली असून त्याची सुरुवात अशोक वाटिका चौका जवळील वजीबदार पेट्रोल पंपा पासून करण्यात आली ह्या वेळी वाशिम अकोला जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नवीन प्रकाश सिंह ठाकूर, पदाधिकारी नरेश अग्रवाल, महेंद्र अग्रवाल, गुरुपाल सिंह नागरा, प्रभाजीतसिंह साहनी, हेमंत आनंदानी, राजेश चावला, दीपक म्हैसने, सुरेश वानखेडे, श्रीकांत रामटेके, व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके उपस्थित होते, ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचे पेट्रोलियम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.