देवळीत पंतप्रधान मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा

    दिनांक :17-Sep-2020
|
- वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान
तभा वृत्तसेवा
देवळी,
देवळी शहर आणि ग्रामीण मंडळ भारतीय जनता पार्टीकडुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाचा वृक्षारोपण आणि स्वछताने शुभारंभ करण्यात आला.
 
deoli_1  H x W: 
 
स्थनिक मिरननाथ मंदिर परिसरा मध्ये स्वच्छता मोहीम, मास्क वाटप, वृक्षारोपण व संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाअध्यक्ष शिरीष गोडे, मिलिंद भेंडे, न.प. देवळी अध्यक्षा सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर देवळी शहर भाजप अध्यक्ष रविंद्र कारोटकर, देवळी ग्रामीण मंडळ भाजप अध्यक्ष दशरथ भुजाडे, देवळी महिला आघाडी प्रमुख शुभांगी कुर्जेकर, भाजप युवा मोर्चा चे पदाधिकारी अंकित टेकाडे, रवी भणारकर, देवळी शहर भाजप चे पदाधिकारी नारायण सुरकार, निखिल कावळे, दिनेश वैद्य, दीपक घोडे, सुरज कानेटकर, दीपक कामडी, सुरज पडोळे, प्रवीण पाटील, संतोष बियाला, किरण तेलरांधे, गिरीश आटे, मनोज बकाने, विनोद तेलरांधे, नगरसेवक सारीका लाकडे, संगिता तराळे, सुनिता बकाणे, महिला आघाडी मनिषा कामडी, अर्चना तडस, ज्योती खाडे, माया वडेकार आदी उपस्थित होते.