राजीव रतन रूग्णालयाला कोवीड केंद्राची मान्यता द्या

    दिनांक :17-Sep-2020
|
- सिमेंट कंपन्याच्या रूगणालयांचा समावेश करा
- आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
घुग्घुस येथील वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेडचे राजीव रतन रूग्णालय तसेच गडचांदूर परिसरातील माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एलअ‍ॅन्डटी या सिमेंट कंपन्याच्या रूग्णालयांना कोवीड केंद्र म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
 
 
sudhir_1  H x W
 
घुग्घुस शहरात तसेच लगतच्या परिसरात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्ह्यातील वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता शासकीय रूग्णालयांवर मोठा ताण पडत आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे घुग्घुस येथील वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेडच्या राजीव रतन रूग्णालयाला कोवीड केंद्र म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व जिल्हा परिषद सभापती नितू चौधरी यांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली. या माध्यमातून घुग्घुस शहरातील तसेच लगतच्या परिसरातील रूग्णांसाठी योग्य सोय उपलब्ध होईल.
 
 
 
त्याचप्रमाणे कोरपना तालुक्यातील गडचांदुर परिसरात माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अ‍ॅन्ड टी या सिमेंट कंपन्याची रूग्णालये उपलब्ध आहेत. या रूग्णालयांनासुद्धा कोवीड केंद्र म्हणून मान्यता दिल्यास जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यातील कोवीड रूग्णांना त्याठिकाणी उपचारार्थ योग्य सोय उपलब्ध होईल व प्रशासनावरील ताणही कमी होईल. ही बाब लक्षात घेता घुग्घुस येथील वेस्टर्न कोलफिल्डस् लिमीटेडचे राजीव रतन रूग्णालय तसेच गडचांदुर परिसरातील माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अ‍ॅन्ड टी या सिमेंट कंपन्याच्या रूगणालयांना कोवीड केंद्र म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्याचप्रमाणे वेकोलि प्रशासन आणि माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अ‍ॅन्ड टी या सिमेंट कंपन्यांच्या व्यवस्थापनालासुद्धा त्यांनी पत्रे पाठविली आहेत.