जनसंचारला सराफांचा प्रतिसाद

    दिनांक :17-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला असून आज १७ ते २४ पर्यंत सलून तसेच ब्युटीपार्लर असोसिएनचे वतीनेसुध्दा स्वयंप्रेरणेने बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष विलास अंबरवेले यांनी केली.
 
sarafa_1  H x W 
 
आज पितृमोक्ष अमावस्या, प्रत्येक हिंदू कुटुंबात आपल्या स्वर्गीय पितरांना श्रद्धापूर्वक स्मरण करण्याचा दिवस, उत्सवप्रिय नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी कारण ठरले. हिंगणघाट शहरात तसेच ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाने उग्र रूप धारण केले असून एका आठवड्यातच ७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.
 
 
शहरात तसेच ग्रामीण भागातसुद्धा सर्वत्र कोरोना पसरला आहे. लोकांमधे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असूनही आम जनता मात्र काळजी घेतांना दिसुन येत नाही. प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारला असता कोरोना या आजाराला गांभीर्यने न घेता शहरातील बाजारपेठेत तसेच मुख्य मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत होते.
 
 
पुढे नवरात्र, विजयादशमी, दीपावली अश्या मोठ्या सणांच्यावेळी सामान्य जनता रस्त्यावर आल्यानंतर कोरोनाची काय स्थिति राहील, याची कल्पनाच न केलेली बरी. नागरिकांनो, आता तरी शासन निर्देश पाळा,स्वतःची तसेच स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जनता कर्फ्यू पाळा, कोरोनाची साखळी खंडित करा, असे आवाहन करण्यात येत आहे.