अकोल्यात पत्रकारांचा सेरोलाॅजिकल सर्व्हे

    दिनांक :17-Sep-2020
|
अकोला,
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाशी संलग्नित अकोला श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी सेरोलाॅजिकल सर्व्हेचे आयोजन गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन अकोला येथे करण्यात आले होते. 
 
survey_1  H x W 
 
संघटनेचे अध्यक्ष अजय डांगे यांच्या पुढाकाराने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शहरातील पत्रकारांनी या सर्व्हेला उत्तम प्रतिसाद देत तपासणीसाठी रक्तनमुने दिलेत. ज्येष्ठ पत्रकार मोहन काजळे गुरुजी यांच्या रक्ताचा नमुना घेऊन या शिबिराची सुरुवात करण्यात आली. खासगीमध्ये ही टेस्ट दोन हजार रुपयांमध्ये करून दिली जाते. पत्रकारांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ही चाचणी मोफत करून देण्यात आली. या शिबिरासाठी संघटनेचे अध्यक्ष अजय डांगे, उपाध्यक्ष राजेश शेगोकार, मनोज भिवगडे, कोषाध्यक्ष प्रबोध देशपांडे यांच्यासह , जीवन सोनटक्के, प्रवीण ठाकरे, गोपाल हागे, विशाल बोरे, नीलेश जोशी, सुगत खाडे, संतोष येलकर, कुंदन जाधव, सागर कुटे, अनुप ताले, शिवाजी भोसले, दिलीप ब्राह्मणे, महेश घोराळे, शुभम बायस्कर, अतुल जयस्वाल,संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर उमेश कवळकर व त्यांच्या चमूने पत्रकारांच्या आरोग्य सर्वेक्षणासाठी सहकार्य केले. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सहकार्य केले.