शेगांव - मलकापूर किसान रेल्वे हब होणार

    दिनांक :17-Sep-2020
|
बुलडाणा,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शेतकर्‍यांचा भाजीपाला, फळे, फळबाग उत्पादकांना आपला माल परराज्यात व इतर देशात रेल्वे वाहतुकीच्या माध्यामातून चांगल्या किंमतीत विकता यावा यासाठी किसान रेल्वे प्रत्येक जिल्ह्यात व ग्रामीण भागात सुरु करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा येथील कृषी उत्पादकांनी लागवड केलेली संत्रे, केळी, सिताफळ, मिरची, चणा, हळद, पान यासह इतर उत्पादनाला तसेच नाशवंत वस्तू वातानुकुलीत डब्यातून वाहतुक केल्या जाईल. शेगांव- मलकापूर रेल्वे स्थानक किसान रेल्वचे हब सेंटर राहणार असून येत्या 18 सप्टेंबर रोजी रेल्वेचे अधिकारी तसेच शेतकरी, व्यापारी समन्वयाचा झुम अ‍ॅपद्वारे ऑनलाईन संवाद साधला जाणार असल्याची माहिती पश्चिम विदर्भ परिषदेचे अध्यक्ष तसेच केंद्रीय रेल्वे समितीचे अध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी दिली आहे.
 
 
hub_1  H x W: 0
 
आज दि. 16 सप्टेंबर रोजी विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते बोलत होते. त्या प्रसंगी भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सचिव दिपक वारे, प्रा. जगदेराव बाहेकर, माजी आ. विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, विजया राठी, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, उदय देशपांडे, यतीन पाठक, अलका पाठक, सिद्धार्थ शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी सांगितले की, पश्चिम विदर्भात उत्पादन होणारा भाजीपाला तसेच संत्रे, केळे, सिताफळ, दुध, पान, वनसंपदा आयुर्वेदीक औषधी किसान रेल्वे द्वारे भारतातील प्रत्येक राज्यात तसेच विदेशात सुद्धा मागणी असणारे शेती उत्पादनाला चांगला भाव मिळणार तसेच दळणवळणाच्या दृष्टीने लागणारा वाहतुक दराचा चाळीस टक्के खर्च वाचणार असल्याचे शेतकर्‍यांना दुहेरी लाभ होणार आहे.
 
 
 
अमरावती येथून किेसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढे पश्चिम विदर्भातील चारही जिल्ह्यांना किसान रेल्वेद्वारे जोडले जाणार आहे. त्यासाठी शेगांव व मलकापूर हे बुलडाणा जिल्ह्यातील दोन रेल्वे स्टेशन रेल्वे हब घोषीत करण्यात आले आहे. या संदर्भात शेतकरी, व्यापारी तसेच लोकप्रतिनिधी यांना अधिकची माहिती व संपुर्ण समन्वयाची कल्पना देण्यासाठी रेल्वेचे अधिकार्‍यांची रेल्वे बुकींग करण्यासाठी येत्या 18 सप्टेंबर रोजी 11 वाजता ऑनलाईन झुमअ‍ॅपद्वारे प्रक्षेपण होणार आहे. त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन दिनेश सुर्यवंशी यांनी केले आहे.