'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मोहीमेची प्रभावी सुरूवात

    दिनांक :18-Sep-2020
|
- पहिल्याच दिवशी 30618 घरांना भेटी
बुलडाणा,
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात 15 सप्टेंबर पासून माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वीरित्या सुरू झाली. जिल्ह्यातही काल पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी पथकातील सदस्यांनी 30 हजार 618 घरांना भेटी देत नागरीकांची तपासणी केली. यामध्ये शहरी भागात 1779 व ग्रामीण भागात 28 हजार 839 गृह भेटींचा समावेश आहे.
 

my family_1  H  
 
भेटीमध्ये केलेल्या तपासणीत शहरी भागात 17 व ग्रामिण भागात 190 असे 207 व्यक्तींना कोविडची लक्षणे आढळून आली आहेत. त्यापैकी 48 व्यक्तींना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये ऑक्सिजनची शरिरातील स्तर 95 टक्क्याच्या खाली असलेले 13 व्यक्ती तपासणीत आढळून आले आहेत. हे सर्व नांदुरा तालुक्यातील आहे. सर्वात जास्त लक्षणे असलेले 76 व्यक्तीसुद्धा नांदुरा तालुक्यात आढळून आल्या आहेत. तसेच या तपासणीदरम्यान पथकाला ग्रामीण भागात 2378 व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेल्या दिसून आल्या, तर शहरी भागात ही संख्या 91 आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत ही मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान घरी आलेल्या पथकाला सहकार्य करून तपासणी करू द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.