अंकीत गोयल गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक

    दिनांक :18-Sep-2020
|
- पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूरला बदली
गडचिरोली,
राज्यातील आयपीएस अधिकार्यांच्या शासनाने बदल्या केल्या असून गडचिरोलीचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून परिमंडळ १० मुंबईचे पोलिस उपायुक्त अंकीत गोयल यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
 
ankit goyal_1   
 
राज्यातील २२ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांचा समावेश आहे. मोहीतकुमार गर्ग यांची रत्नागीरीचे पोलिस अधीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे.
 
 
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अनेक नक्षली कारवायांना सडतोडे प्रत्युत्तर देण्यात आले. अनेक नक्षल्यांचा खातमा करण्यात आला, तर मोठमोठ्या कॅडरच्या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. बड्या नक्षली नेत्यांना अटक करण्यात आली. यामुळे नक्षली चळवळीला चांगलाच हादरा बसला.