'त्या' चोरट्याला २४ तासात अटक

    दिनांक :18-Sep-2020
|
- स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
तभा वृत्तसेवा
वर्धा,
चंद्रपूरकडून नागपूरला जाणाऱ्या कार चालकाला स्वतःची कार बिघडल्याचे सांगून लिफ्ट मागून कार लंपास करणाऱ्याला समुद्रपूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली.
 

car_1  H x W: 0 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार १५ रोजी सकाळी 9 वाजता अभय प्रभाकर वांगलकर, (30) रा. जेठपुरा, जिल्हा चंद्रपूर हे मित्रासह चंद्रपूरवरून नागपूरला जात असताना अनोळखी व्यक्तीने खांबडा गावादरम्यान लिफ्ट मागून सांगितले की त्याची गाडी जाम चौरस्त्यापुढे बिघडली आहे मला तेथे सोडून द्या अशी विनंती केल्यावरून कार चालकाने त्याला लिफ्ट दिली. दरम्यान, कार चालक अभय वंगालकर व त्यांचे मित्र चहा घेण्याकरिता जाम येथील संतराम हॉटेल मध्ये गेले असता आरोपी मी चहा घेत नाही असा बहाणा करून कारमध्येच बसून राहिला. अभय आणि त्याचे मित्र चहा घेऊन परत आले असता त्यांना कार आढळून आली नाही. कार न दिसल्याने त्यांनी समुद्रपूर पोलिस स्टेशन गाठून निळ्या कलरची ह्युंदाई आय 20 कार क्रमांक एम.एच. 34 बी.आर. - 0649 जु.की. 05 लाखची कार चोरल्याची तक्रार दिली.
 
 
सदर गुन्ह्याचा समांतर तपास मा. पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात स्थागुशा, वर्धाचे पथक करीत असताना गुप्त बातमीदाराच्या खात्रीशीर खबरेवरून एक पथक नागपूर करीता रवाना होऊन दिवसभर सदर आरोपीचा शोध घेऊन नागपूर मधील महाल परिसरात सापळा रचून मोठया शताफीने आरोपीस रात्रदारम्यान ताब्यात घेण्यात आले. विचारपूस दरम्यान आरोपीने स्वतःचे नाव आरिफ शेख लियाकत शेख, (26), रा. यादव नगर जि. नागपूर असे सांगून सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सदर गुन्ह्यात चोरी गेलेली कार जप्त करण्यात आली. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पो.स्टे. समुद्रपूर यांचे ताब्यात देण्यात आले.
 
 
सदर कारवाई. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश एम ब्राह्मणे पोलिस निरीक्षक स्थागुशा, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, मनीष श्रीवास, यशवंत गोल्हर, अभिजीत वाघमारे यांनी केली.