वाशिममध्ये तिसर्‍या दिवशीही जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :18-Sep-2020
|
वाशीम,
16 सप्टेंबर पासून सात दिवसासाठी वाशीम (washim) शहरात जनता संचारबंदीचे (janta curfew) आवाहन व्यापारी मंडळाने केले होते. वाशीममधील (washim) या संचारबंदीला (janta curfew) तिसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनी देखील आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली.
 
washim janta curfew_1&nbs 
 
वाशीम जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता संचारबंदीची मागणी होत होती. यासाठी व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून 16 ते 22 सप्टेंबर पर्यंत जनता संचारबंदीचे आवाहन केले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3200 झाली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येने व्यापार्‍यासह नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. विषाणूला परतवून लावण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
 
 
व्यापार्‍यांनी देखील पुढाकार घेत सात दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार 16 सप्टेंबर पासून जनता संचारबंदीला सुरुवात झाली. आजच्या तिसर्‍या दिवशी व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. वाशीम शहरातील मेडीकल, रुग्णालय सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. दरम्यान रस्त्यावर वाहनधारक, पादचार्‍यांची वर्दळही दिसून आली.
 
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी एकूण 103 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 3144 वर पोहचली आहे. याच दरम्यान आययुडीपी कॉलनी वाशीम येथील 72 वर्षीय एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणार्‍या 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तसेच. 15 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 3144 झाली असून, त्यात 862 सकारात्मक रुग्ण असून, मृतकाची संख्या 56 झाली आहे.