निंबोळी अर्क शेतीस वरदान

    दिनांक :18-Sep-2020
|
- कृषिदूतांनी केली ग्रामस्थांमध्ये जनजागृती
देऊळगाव राजा,
स्थानिक श्री समर्थ कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत निंबोळी अर्क कसा बनवावा? व त्याचा शेतीला कसा व किती प्रमाणात फायदा होतो? याबद्दलची सविस्तर माहिती कृषीदूतांनी दिली. दिवसेंदिवस शेतकर्याद्वारे रासायनिक खतांचा खुप जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो त्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होते आणि त्या विषारी रासायनिक खतांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी निंबोळी अर्क कसा बनवावा व त्याचा वापर कसा व किती प्रमाणात करावा याबद्दल प्रात्यक्षिक करुन शेतकर्याना माहिती दिलीशेतकऱ्यांनी त्यांच्या मनातील असलेल्या अनेक शंकांचे प्रश्न विचारुन निवारण करुन घेतले.
 
Neem extract_1   
 
उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या उपलब्ध असतांना जमा कराव्यात व वाळवून साफ करुन साठवून ठेवाव्यात, फवारणीच्या आगोदरच्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात,5 किलो निंबोळ्याचा चुरा घेऊन 9 लिटर पाण्यात भिजत टाकावा, तसेच 1 लीटर पाण्यात साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा. दुसर्या दिवशी तयार झालेले निंबोळी अर्क कपड्यातुन गाळून घेऊन त्यात 1 लीटर साबणा भचे तयार केलेले द्रावण मीसळावे व ढवळून घ्यावे तसेच निंबोळी अर्क मुख्यतः फवारणीच्या दिवशीच तयार करुन वापरावा.
 
 
यावेळी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक मोहजीतसिंग राजपूत, प्रा. विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषिदुत अभिषेक पुजारी ,विशाल जैवळ,विशाल बुरकुल कृषिकन्या कु.पूजा खार्डे उपस्थित होते.