प्रशांत होळकर वर्धेचे नवे पोलिस अधीक्षक

    दिनांक :18-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. वर्धेचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराव तेली यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर प्रशांत होळकर येणार आहेत.
 
prashant holkar_1 &n 
 
प्रंशात होळकर सध्या अमरावती येथे पोलिस उपायुक्त (मुख्यालय) पदावर कार्यरत आहे .यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती. वाशीम येथे २०१६ पोलिस अधीक्षक होते.
 
 
पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांचे सह अनेक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पदस्थापनेचे आदेश काढण्यात येणार आहे. वर्धेतूम तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यानंतर स्मरणात राहील असे कोणतेही पोलिस अधीक्षक झाले नाही. डॉ. बसवराज तेली त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांचा तपास लागला असला तरी त्यांचाही कार्यकाळ फारसा प्रभावी राहिलेला नाही.