वसंत जाधव भंडाऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक

    दिनांक :18-Sep-2020
|
भंडारा,
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांच्या बदलीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. अरविंद साळवे यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण झाले असून जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून वसंत जाधव रुजू होणार आहेत.
 

vasant jadhav_1 &nbs 
 
जिल्ह्यात घडलेल्या काही घटना नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकी नंतर यात आणखी भर पडली. तेव्हापासून अशा चर्चा होत्या. दरम्यान 17 रोजी राज्यातील पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात साळवे यांचाही समावेश आहे. अरविंद साळवे यांची चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. तर भंडारा येथे वसंत जाधव हे रुजू होणार आहेत. शीघ्र कृती दल, मुंबईचे उपयुक्त म्हणून जाधव कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी भंडाराचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे.