विश्व मांगल्य सभा नागपूर प्रांततर्फे अधिक मास चिंतनमाला

    दिनांक :22-Sep-2020
|
नागपूर,
कोरोना महामारीच्या सावटामुळे सर्वत्र अनिश्चितता तसेच अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत देव, देश व धर्माकरिता समर्पित विश्व मांगल्य सभा नेहमीच प्रयत्नशील असते. म्हणूनच अधिक मासाचे औचित्य साधून ऑनलाईन ‘अधिकमास चिंतनमाला’ संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चतुःसूत्रीवर आधारित एक आगळावेगळा उपक्रम घेऊन येत आहे. जीवन व्यापन करणार्‍या भारतमातेच्या सुकन्यांची जीवनी ऐकण्याची संधी सर्वांना प्राप्त होणार आहे. प्रीतिलता वड्डेदार, रमाबाई रानडे, कमलाताई होस्पेट यासारख्या ज्ञात-अज्ञात स्त्री मौक्तिकांचे दर्शन श्रवण माध्यमातून आपणास होणार आहे. विश्व मांगल्य सभेच्या नागपूर प्रांततर्फे आवाहन करण्यात आले आहे की आपण सर्वांनी घरातच राहून मनोबल वाढविणार्‍या व मानसिक उमेद जागविणार्‍या या कार्यक्रमास संलग्नत व्हावे व आपल्या सबल, समर्पित महिला पूर्वजांच्या आदर्शांचा आनंद घ्यावा.
 
adhik mass_1  H 
 
या कार्यक्रमाशी जुळण्यासाठी गूगल अ‍ॅप डाऊनलोड करावे. 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून दुपारी 4 ते 5 या वेळेत कार्यक्रम होणार असून https://meet.google.com/ssy-vcex-yx या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.