नवी दिल्ली :
कपिल शर्माला कॉमेडी किंग अशी ओळख मिळाली असली, तरीही तो खूप चांगला अभिनेता, अँकर, होस्ट आणि सिंगरदेखील आहे. फॉर्ब्स इंडिया सेलिब्रिटीच्या टॉप 100 च्या लिस्टमध्येदेखील तो दिसला होता. आधी कपिल शर्माचा ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ शो यायचा.
आता तो ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवतो. कॉमेडी शो व्यतिरिक्त कपिलने चित्रपटातदेखील काम केले आहे. कपिल शर्माकडे कॉमेडी शोजच्या व्यतिरिक्त कमाईची अनेक साधने आहेत. या कमाईचा हिस्सा म्हणून तो सरकारला किती कर देतो, हे तुम्हाला माहितेय् का? कपिलने आपल्या एका शोदरम्यान आयकरबाबत खुलासा केला. तो एका वर्षात 15 कोटी रुपये आयकर भरतो. आयकर भरत राहणे गरजेचे आहे. कारण, यामुळे आपल्या देशाच्या विकासात आपण योगदान देतो, असे कपिलने म्हटले आहे. ज्या कार्यक्रमात कपिलने हा खुलासा केला, त्यात ऐश्वर्या राय बच्चन पाहुणी म्हणून आली होती. कपिल भरत असलेल्या आयकराचा आकडा ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.