बालाकोट हल्ल्यावर शंका घेणार्‍या काँगे्रसने माफी मागावी

    दिनांक :10-Jan-2021
|
- भाजपाचा जोरदार हल्लाबोल
 
नवी दिल्ली, 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने 26 फेबु्रवारी 2019 रोजी बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर केलेल्या हल्ल्यात 300 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले होते, अशी कबुली पाकिस्ताननेच दिली असल्याने, या हल्ल्याबाबत आणि जवानांच्या शौर्यावर शंका घेणार्‍या काँगे्रसने आता देशाची मागावी, असा जोरदार हल्ला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज रविवारी चढविला.
 
 
prakash_1  H x
 
एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे माजी राजदूत झफर हिलाली यांनी बालाकोट हल्ल्यातील सत्य विशद केले होते. भारताने पाकिस्तानात घुसून इतका भीषण हल्ला केल्यानंतरही पाकिस्तान सरकार आणि लष्कराने कोणतीही कारवाई केली नाही. आमच्या राज्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर भीतीचे सावट दिसत होते, अशी टीका हिलाली यांनी केली होती.
 
 
याच मुद्यावरून जावडेकर यांनी काँगे्रस आणि पुरावे मागणार्‍या टोळीवर जोरदार हल्ला चढविला. या लोकांनी केवळ हवाई दलाचाच नाही, तर उरी हल्ल्यानंतर व्याप्त काश्मिरात घुसून पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांचा खातमा करणार्‍या लष्करी जवानांचाही अपमान केला आहे. सशस्त्र जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करणे, त्यांचे मनोबल खचविणे ही काँगे्रसची फार जुनी सवय आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला.
 
 
तत्पूर्वी, भाजपाचे राज्यसभा सदस्य हरनाथसिंह यादव यांनीही वृत्तसंस्थेशी बोलताना काँगे्रसवर टीकेची झोड उठवली. सशस्त्र दलांचा अपमान करण्यात काँगे्रसी नेत्यांना कोणता आनंद मिळतो? आपल्या जवानांच्या शौर्यावर या पक्षाला विश्वास का नाही, हे लोक सतत पुरावे का मागत असतात, असा सवाल त्यांनी केला.