आसामात पुन्हा भाजपाचीच सत्ता

    दिनांक :11-Jan-2021
|
जे. पी. नड्डा यांचा विश्वास
सिलचर,
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या सरकारने पाच वर्षांच्या काळात आसामचा सर्वांगीण विकास केला असल्याने, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपाच सत्तेत येणार आहे, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सोमवारी येथे व्यक्त केला.
 
a _1  H x W: 0
 
सिल्चर येथे आयोजित भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला ते संबोधित होते. 2016 मध्ये आसामात सत्तेत आल्यापासून, राज्यात झालेल्या सर्वच स्तरावरील निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत आणि स्वायत्त परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठे यश मिळविले आहे, असे नड्डा यांनी सांगितले.
 
आधीच्या सरकारांच्या काळात आसामची संस्कृती, भाषा आणि ओळख हरवली होती. भाजपाने ती पुन्हा प्राप्त केली आहे. अनेक बंडखोर संघटना येथे सकि‘य होत्या. आता हे राज्य बंडखोरांच्या कारवायांपासूनही मुक्त झाले आहे. समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन, भाजपा सरकारने आसामचा विकास केला आहे. 50 वर्षांपासून चालत आलेला बोडो वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऐतिहासिक शांतता करारातून सोडविला. बंडखोरांनाही मु‘य राष्ट्रीय प्रवाहात आणले, असे ते म्हणाले.