नीम पार्क फुटबॉल क्लब ठरला अजिंक्य

    दिनांक :11-Jan-2021
|
- फाइव्ह-ए-साईड फुटबॉल स्पर्धा
नागपूर, 
शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात नीम पार्क फुटबॉल क्लबने डीडीएसवायएस संघाला २-१ अशा गोलफरकाने पराभूत करीत शिवभोला क्रीडा मंडळातर्फे आयोजित फाइव्ह-ए-साईड फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद आपल्या नावे केले आहे.

f _1  H x W: 0  
 
 
रामनगर येथील शिवमंदिर, मरारटोली फुटबॉल मैदानावर रविवारी सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघाने एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू अवघ्या ८ व्या मिनिटाला डीडीएसवायएस संघाच्या हर्ष चौबेने गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतू ही आघाडी अधिक वेळ टिकविण्यात डीडीएसवायएस संघाला यश मिळाले नाही. प्रत्युत्तरात केलेल्या चढाईत नीम क्लबच्या तिलक qसगने १० व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन मिनिटानंतर गिफ्सन साजीने १२ व्या मिनिटाला नीम क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून देत मध्यंतरापर्यंत कायम ठेवली. मध्यंतरानंतर डीडीएसवायएसचे खेळाडू बरोबरी साधण्यासाठी चांगलेच प्रयत्न केले. परंतु, निर्धारीत वेळेपर्यंत कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. नीम पार्क क्लबने आघाडी अंतिम क्षणापर्यंत कायम ठेवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
 
 
तत्पूर्वीच्या उपांत्य सामन्यात नीम पार्क फुटबॉल क्लबने डीएनडी फुटबॉल क्लबला २-१ अशा गोलफरकाने पराभूत केले. नीम क्लबच्या सागर मिश्राने(२१) व गिफ्सन साजीने(२३) व्या मिनिटाला गोल केले. डीएनडी क्लबच्या टी. गजभियेने २६ व्या मिनिटात गोल करू शकला. दुसèया उपांत्य सामन्यात नकीब अख्तरने १५ व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या बळावर डीडीएसवायएस संघाने कनोजिया फुटबॉल क्लबला १-० ने पराभूत करून अंतिम फेरीत गाठली होती.
 
 
 
पुरस्कार वितरण सोहळ्यात संदीप डेव्हलपर्स प्रा. लि. सीईओ उमेश धोटे, माजी रणजीपटू अनिरुद्ध पालकर, बिगबेन फुटबॉल क्लबने प्रा. आत्माराम पांडे, शिवभोला क्रीडा मंडळाचे अतुल नेवारे, सिद्धार्थ काळे, राहुल नेवारे, नईम अन्सारी, अजय जिचकार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला १० हजार रुपये व चषक आणि उपविजेत्या संघाला ७ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबरोबर उत्कृष्ट खेळाडू म्हणून राहुल विरमानी(हिलटॉप क्लब), सामनावीर म्हणून ख्रिस्टोपर पीटर(डीडीएसवायएस) व उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून सुनील पिल्ले (नीम पार्क क्लब) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.