राज्य एअर रायफल स्पर्धेचे उद्घाटन

    दिनांक :11-Jan-2021
|
नागपूर,
नागपूर जिल्हा रायफल असोसिएशन आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य एअर रायफल नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन प्रियदर्शिनी महाविद्यालयात जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते नुकतेच झाले.
 

s_1  H x W: 0 x 
याप्रसंगी जिल्हा असोसिएशनचे संस्थापक सचिव चंद्रकांत देशमुख, लोकमान्य टिळक संस्थेचे संचालक अभिजित देशमुख, महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे पदाधिकारी विराज शेलटकर, जिल्हा संघटनेचे सहसचिव उधमqसग, कोषाध्यक्ष दिलीप बेहरे, अजय कडू, समरजित यादव, क्लिफोर्ड नायडू, शशांक चौहान, अभिषेक राऊत, अभिनव पांडे, सुमंत तायडे, समीक्षा नरqसगकर आदी उपस्थित होते. सहभागी खेळाडूंनी ‘भौतिक अंतराचेङ्क पालन केले.
 
 
स्पर्धेत नागपूरसह, पुणे, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावतीसह विविध जिल्ह्यांतील एकूण ७० नेमबाज सहभागी झाले आहेत. बारा वर्षीय विराज भंभवाणी स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर विभागीय व जी. व्ही. मालवणकर स्मृती अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.