सलामी सामन्यात विदर्भ पराभूत।

    दिनांक :11-Jan-2021
|
- सय्यद मुश्ताक अली टी २० चषक
नागपूर, 
फलंदाजाचे अपयश आणि शेवटपर्यंत गोलंदाजीत नसलेले सातत्यामुळे सय्यद मुश्ताक अली चषक टी २० क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाला सलामी सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विदर्भाची स्पर्धेची सुरुवात ही पराभवाने झाली आहे.
 
b _1  H x W: 0
 
कोरोनामुळे तब्बल दहा महिन्यानंतर घरगुती स्पर्धेचा प्रारंभ सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेच्या माध्यमातून इंदूर मध्ये झाला. स्पर्धेत विदर्भाची सलामी लढत राजस्थानविरुद्ध एमराल्ड हाईट्स मैदानावर झाली. परंतू या सामन्यात ३ गडी राखून राजस्थान संघाने विजय नोंदविला.
 
 
सामन्यात नाणेफेक qजकून राजस्थान संघाने विदर्भाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विदर्भाकडून सामन्यात डावाची सुरुवात सलामीवीर जितेश शर्मा आणि अथर्व तायडे यांनी केली. परंतू अवघ्या पहिल्याच चेंडूला चोरटी धाव घेण्याच्या नादात सलामीवीर फलंदाज जितेश शर्मा धावबाद झाला. त्यामुळे शुन्य धावांवरच विदर्भाला पहिला झटका बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार गणेश सतीशने तायडेच्या साथीने सावध खेळ करण्यास प्रारंभ केला. तोच पहिल्या षटकाच्या चवथ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात डी चहरच्या चेंडूवर तायडे एम लोमरोर कडे झेल देवून परतला. त्यामुळे विदर्भाला पहिल्याच षटकांत दुसरा धक्का बसला.
 
 
यानंतर आर राठोड च्या साथीने धावा जोडण्याचा प्रयत्न सतीशने केला. परंतू तो प्रयत्नही फसला. २.१ षटकांत राठोडला चहरने तंबूत धाडत विदर्भाला तिसरा धक्का दिला. यानंतर फलंदाजीला आलेल्या सिद्धेश वाठने सतीशच्या साथीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांनीही सावध खेळ केला. परंतू ८.३ षटकांत गणेश सतीश चहरच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यामुळे अवघ्या २९ धावांवर विदर्भाने चार गडी गमविले. यानंतर फलंदाजीला आलेल्या फलंदाजांना अधिक वेळ खेळपट्टीवर जम बसविण्यात अपयश आले. एका बाजूने काही वेळ वाठने संघाचा धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू तो देखील वेगाने धावा जोडण्याच्या नादात बाद झाला. त्यामुळे १९.३ षटकांतच विदर्भाचा डाव अवघ्या १०४ धावांवर संपुष्टात आला. फलंदाजीत सर्वाधिक ३१ धावांचे योगदान सिद्धेश वाठने दिले. तर सलामी जोडीसह इतर दोन फलंदाज एकेरी धावा काढून परतले. गोलंदाजीत प्रत्येकी तीन गडी डी चाहर आणि आर चाहरने टिपले. तर दोन गडी ए चौधरीने बाद केले.
 
 
विदर्भाने दिलेले १०४ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाची सुरुवातही निराशाजनकच झाली. सलामीला आलेला एम qसग आणि त्यानंतर फलंदाजीला आलेल्या एम लोमरोरला वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेने पहिल्याच षटकाच्या तिसèया आणि चवथ्या चेंडूवर या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडत राजस्थानला शुन्य धावांवर दोन धक्के दिले. यानंतर फलंदाजीला आर बिष्णोई आणि सलामीला आलेल्या अनिकेत लांबा याने सावध खेळी करीत संघासाठी धावा जोडणे सुरु केले. परंतू एका बाजूने आक्रमक खेळीच्या नादात बिष्णोई नळकांडेचा बळी ठरला. त्यामुळे २.४ षटकांत तीन बाद १९ अशी स्थिती राजस्थान संघाची झाली. दरम्यान एका बाजूने अनिकेत लांबाने सावध खेळ सुरु ठेवला. मात्र दुसèया बाजूने फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्यामुळे ५४ धावांवर सहा गडी तंबूत धाडण्यात विदर्भाच्या गोलंदाजांना यश आले. त्यामुळे सामन्यात विदर्भ संघ विजय नोंदवितो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतू मधल्या फळीतील फलंदाज आर गुप्ताने नाबाद सर्वाधिक ४१ धावांची खेळी करीत राजस्थान संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत सर्वाधिक ४ गडी दर्शन नळकांडेने तर तीन गडी अक्षय वखरेने टिपले.

संक्षिप्त धावफलक-
विदर्भ - १९.३ षटकांत सर्वबाद १०४.
सिद्धेश वाठ- ३१, अक्षय वानखेडे- १३. गोलंदाजी-डी चाहर ३.३-१०-३. आर चाहर- ४-२७-३.
राजस्थान- १४.३ षटकांत ७ बाद १०६.
ए गुप्ता नाबाद -४१, अनिकेत लांबा- १६.
गोलंदाजी- दर्शन नळकांडे- ३-२०-४, अक्षय वखरे- ४-३३-३.