शेअर बाजाराचा निर्देशांक झाला 49 हजारी

    दिनांक :11-Jan-2021
|
- प्रथमच ऐतिहासिक स्तर
मुंबई, 
देशात प्रचंड प्रमाणात वाढलेली विदेशी गुंतवणूक आणि लसीकरणाची व्यापक तयारी यामुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी बड्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदीवर भर दिल्याने, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सोमवारी 487 अंकांच्या कमाईसह प्रथमच 49 हजाराच्या नव्या ऐतिहासिक उंचीवर विराजमान झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारही नव्या शिखरावर पोहोचला आहे.
 
sebi _1  H x W:
 
शेअर बाजाराची आज सकाळची सुरुवात 300 अंकांच्या कमाईने झाल्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली. बहुतांश कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाला होता. दिवसभराच्या व्यवहारानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 486.81 अंकांच्या कमाईसह 49,303.79 या स्तरावर बंद झाला.
 
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 137.50 अंकांची कमाई केली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी 14,484.75 या स्तरावर बंद झाला. आजच्या व्यवहारात एचसीएल टेकचा सर्वाधिक फायदा झाला. या कंपनीचे शेअर्स सहा टक्क्यांनी वधारले होते. त्याखालोखाल इन्फोसिस, एचडीएफसी, बजाज ऑटो, मारुती, टेक महिंद्र यासार‘या कंपन्यांना फायदा झाला. तिथेच, बजाज फायनान्स, रिलायन्स, एल अ‍ॅण्ड टी, कोटक बँक आणि भारतीय स्टेट बँकेला नुकसान झाले.