सायना नेहवाल कोरोनाची लागण

    दिनांक :12-Jan-2021
|
- अहवाल मिळाला नाही, केवळ तोंडी सांगण्यात आले
बँकॉक, 
मला अद्याप माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला नाही, मात्र मी कोरोनाबाधित असल्याचे संयोजकांकडून तोंडी सांगण्यात आले, असे भारताची फुलराणी सायना नेहवाल म्हणाली.
 
A_1  H x W: 0 x
 
वास्तविक चाचणीनंतर पाच तासानंतर अहवाल यायला हवा होता, परंतु माझ्याबाबतीत तसे झाले नाही. मला कालपासून चाचणीचा अहवाल मिळाला नाही. हा सर्व प्रकार गोंधळात टाकणारा आहे. तू कोरोनाची बाधा झाली असून तू बँकॉकमधील रूग्णालयात जा असे मला आज मी सरावापूर्वी हलकासा व्यायाम करीत असताना मला तोंडी सांगण्यात आले, असे सायनाने सांगितले.
तत्पूर्वी, भारतीय बॅडqमटन संघटनेने नेहवाल व एच.एस. प्रणोयच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक असल्याची पुष्टी केल्याचे सूत्राने सांगितले. दोन्ही खेळाडूंना पुढील चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
 
दरम्यान, कोरोना संकटामुळे बèयाच काळापासून आंतरराष्ट्रीय सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. अशातच आता सायना नेहवाल थायलंड ओपन सुपर १००० स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा १२ ते १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु, आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
 
यापूर्वी लंडन ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेत्या सायनाने बीडब्ल्यूएफद्वारे लावण्यात आलेल्या अंतर्गत निर्बंधांवर नाराजी व्यक्त करीत ट्विट केले होते. सायनाने ट्विट केले की, तपासणीमध्ये सर्व नकारात्मक अहवाल आल्यानंतरही फिजियो व प्रशिक्षक आम्हाला भेटू शकत नाहीत? आम्ही चार आठवड्यांपर्यंत स्वतःला फिट कसे ठेवणार. आम्हाला चांगल्या परिस्थिती खेळायचे आहे. कृपया यावर मार्ग काढा.
 
दरम्यान, एच.एस.प्रणय, पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा, धृव कपिला, मनु अत्री हेसुद्धा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बँकॉकला पोहोचले आहेत. पारुपल्ली कश्यपने पत्नी सायनासोबत समाजमाध्यमात छायाचित्र सामायिक करीत लिहिले होते की, बèयाच काळाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही थायलंड स्पर्धेतून पुनरागमन करण्यास खूप उत्सुक आहे.