विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयी जनजागृती

    दिनांक :13-Jan-2021
|
नागपूर, 
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी साजरा करण्यात येणार्‍या राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीने न्यायाधीश सभागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
a_1  H x W: 0 x
 
अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अभिजित देशमुख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. राजेंद्र राठी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अभिजित देशमुख म्हणाले की, स्वामी विवेकानंद आपले विचार आणि आदर्शसाठी संपूर्ण जगात विख्यात आहेत. त्यांनी आपल्या विचारामुळे संपूर्ण जगात युवा वयातच लोकप्रियता व प्रसिद्धी मिळविली होती.
 
‘‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका’’ हा स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश ऊर्जा निर्माण करणारा असून यापासून युवकांनी प्ररेणा घ्यावी असेही आवाहन अभिजित देशमुख यांनी केली. तसेच त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना-2015, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा (पोस्को) व मनोधैर्य योजना व तरतुदींची माहिती दिली. तर अ‍ॅड. राजेंद्र राठी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीविषयी सांगितले. कार्यक्रमाला विधी विद्यार्थी, विधी स्वयंसेवक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.