पासपोर्टप्रकरणी विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा दिलासा

    दिनांक :13-Jan-2021
|
- आ. भांगडीया यांची याचिका फेटाळली
नागपूर,
ना. विजय वडेट्टीवार यांनी अवैधरित्या पासपोर्ट मिळविल्याने त्यांच्याविरुद्ध एफआरआय दाखल करावा अशा मागणीची आ. मितेश भांगडीया यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे ना. वडेट्टीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
s_1  H x W: 0 x
 
ना. वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर असलेले गुन्हे दडविल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. आ. भांगडीया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट विभागापर्यंत तक्रार केली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी न्या. सुनील शुक्रे व न्या. अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सांगितले की, पासपोर्ट विभागाला या प्रकरणाची चौकशी करू द्या. त्यानंतर एफआरआय दाखल न झाल्यास याचिकाकर्त्याला न्यायालयात येता येईल. चौकशीपूर्वीच एफआयआर दाखल करण्याचा आदेश देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट करीत ही याचिका फेटाळली.