मृत्यूसंख्या नियंत्रणात, नव्या ४६७ बाधितांची भर

    दिनांक :13-Jan-2021
|
नागपूर, 
नागपूर जिल्ह्यात आज ०७ बाधितांचा मृत्यू झाला असून नव्या ४६७ बाधितांची भर पडली. ३५८ कोरोनामुक्त झाले. नागपूर जिल्ह्यात आज आरटीपीसीआर पद्धतीने ४१११, रॅपिड अँटिजन पद्धतीने ६७७, असे एकूण ४७८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात १६३ खाजगी प्रयोगशाळांमध्ये, अँटिजन पद्धतीने ८७, मेडिकल रुग्णालयात ५९,
 
corona_1  H x W
 
मेयो रुग्णालयात ५१, एम्समध्ये ३३, नीरी २६, रातुम नागपूर विद्यापीठ ४८, असे एकूण ४६७ नमुने सकारात्मक आले. बाधितांची एकूण संख्या १२९२२५ झाली. त्यात २५८४६ ग्रामीण, शहर १०२५५६, जिल्ह्याबाहेरील ८२३ आहेत. बाधितांची मागील दोन महिन्यात आझ सर्वधिक संख्या आहे. ४७८८ रुग्णांपैकी ४३२१ रुग्णांचे नमुने नकारात्मक निघाले.

आज ३५८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १२०५४८ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे आजचे प्रमाण ९३.२९ टक्के आहे. आज ग्रामीणमध्ये ०१, शहरात ०२ तसेच जिल्ह्याबाहेरील ०४, अशा ०७ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ७१६, शहरात २६८५, जिल्ह्याबाहेरील ६४१, असे एकूण ४०४२ बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीणमधील १०७७, शहरातील ३५५८, असे एकूण ४६३५ बाधित रुग्ण असून त्यापैकी १४३६ रुग्णालयात तसेच गृहविलगिकरणात ३१९९ आहेत.