जिजाऊ सृष्टीसाठी स्वतंत्र विकास निधी मिळवून देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

    दिनांक :13-Jan-2021
|
- मराठा विश्वभूषण पुरस्काराने आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे सन्मानित
सिंदखेड राजा,
मातृतीर्थ जिजाऊ सृष्टिची फार मोठी संकल्पना आहे. त्याकरिता स्वतंत्र विकास प्राधिकरण व जिजाऊ सृष्टीसाठी निधी शासनाकडे मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यासाठी शासकिय मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, मला दिलेला पुरस्कार मी सर्व कोरोना योद्यांच्या चरणी अर्पण करतो. सामान्य जनतेला हळूहळू दिलासा देल्याचे मोठे समाधान मला वाटते, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी केले.
 
 
jija_1  H x W:
 
सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी येथे 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बोलतांना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाव्य निवडणूकीत महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा 288विधानसभा मतदार संघात उमेदवार निवडणूक रिंगणात संभाजी ब्रिगेड मार्फत उभे राहणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, यावर्षी ऑनलाईन कार्यक्रम द्वारे जगभरातील करोडो जिजाऊ भक्तांना ऑनलाइन घरी बसल्या बसल्या कार्यक्रम पाहता आला. जिजाऊ जन्मोत्सव हा सर्वासाठी फार मोठा महोत्सव असतो मात्र यावर्षी यावर्षी जिजाऊ भक्तांना येता आलं नाही ही फार मोठी खंत जिजाऊ भक्तांमध्ये आहे.
 
 
 
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मराठा सेवा संघातर्फे पुरस्काराचे वितरण झाले. त्यामध्ये सर्वात मोठा मानला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांना प्रदान करून गौरविण्यात आले. त्यानंतर मराठा समाज भूषण डॉ.सूर्यवंशी, जिजाऊ पुरस्कार प्रांजल पाटील तसेच सम्राट शिवशाहीर पुरस्कार शाहिर रामदास कुरंगळ यांना देऊन सर्वाचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर करतात. जिजाऊ जन्मस्थळ विकास साठी 311 कोटीचा विकास आराखड्यात निधी शासनाने मंजूर केला. मात्र अचानक कोरोना महामारी संकट उभे राहिल्यामुळे शासनाने आरोग्य सुविधेला प्रथम प्राधान्य दिले आम्ही लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन 311 कोटी आणि नवीन जिजाऊसृष्टीसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी मागणी करणार आहे, असे त्यांनी म्हटले. याप्रसंगी आ.श्वेता महाले, माजी आ.रेखाताई खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, प्रदिप बिल्होरे, ज्योतीताई देशमुख यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्यासह आधी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.