जापानी भाषा शिक्षणातून रोजगाराच्या भरपूर संधी/video

    दिनांक :13-Jan-2021
|
-आयटी कंपन्यांमध्ये वाव
नागपूर,
जापान(Japan) हा देश आजवर केवळ हिरोशिमा नागासाकी (Hiroshima Nagasaki )आणि अणुबॉम्बसाठी(Atomic bomb) प्रसिद्ध असल्याचीच चर्चा होत होती पण हे राष्ट्र ऑटोमोबाई, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी कंपन्यांच्या क्षेत्रात जगात अग्रणी मानले जाते. त्यातही याठिकाणी सरासरी वयोमान देखील अधिक असल्याने तरुणांचा देश म्हणून भारताकडे त्या राष्ट्रातील राज्यकर्त्यांना भरपूर अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी भारतीय युवकांनी जापानी भाषा (Japanese language) आत्मसात केल्यास या कौशल्यातून (Skillfully) भरपूर संधी असल्याचे प्रतिपादन असाही जापनीजचे संचालक (Asahi Japanese director) मंदार सुगवेकर यांनी तरुण भारत फेसबुक लाईव्ह (Tarun Bharat Facebook Live) उपक्रमात  युवकांना मार्गदर्शन करताना केले.
 

a _1  H x W: 0  
 
ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारात आजमितीस 70 टक्के हिस्सा जापानचा((Japan)) आहे. भारत आणि जापान या दोन्ही देशांचे संबंध देखील सलो‘याचे आहेत. भारतात सुरू असलेल्या अनेक विकास प्रकल्पांमध्ये जापान सरकारचे अमूल्य योगदान आहे. देशभरात एकूण 3500 जापानी कंपन्या भारतात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आणि गुंतवणुकीचा आकडा देखील अब्जावधींच्या घरात आहे. दुसरीकडे जापानमध्ये सातत्याने कमी होत असलेली लोकसंख्य आणि विद्यमान नागरिकांचे वृद्धत्वाकडे झुकलेले वयोमान यामुळे भारतासार‘या तरुण देेशाकडून अपेक्षा असल्याचेही सुगवेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
जापान इतर देशाकडे देखील सहकार्याच्या अपेक्षेत असतो पण भारतीय मनुष्यबळ त्यांच्यासाठी प्राधान्य क‘मात आहे. त्यासाठी जापानी भाषेचे शिक्षण आणि त्यांच्या विद्यापीठाचे अभ्यासक‘म पूर्ण करणार्‍या युवकांना अधिक मागणी आहे. जापानी भाषेच्या परीक्षा जुलै आणि सप्टेंबर महिन्यात होतात, त्याचे प्रमाणपत्र मिळते. या भाषा शिक्षणाचे एकूण पाच टप्पे असून यातील एन-2 आणि एन-3 हे दोन टप्पे पूर्ण करणार्‍यांना रोजगाराच्या भरपूर संधी मिळू शकतात. याशिवाय निहोंगो टेस्ट वर्षभरात सहा वेळा होते. यासोबतच जापानी भाषेत बीए व एमए पदवी देखील घेता येते.
 
या भाषांचे शिक्षण घेतल्यास आयटी क्षेत्रातील 50 टक्के रोजगारावर ताबा मिळविणे शक्य आहे. याशिवाय मेकॅनिकल, टेक्नीकल आणि भाषांतर, या कंपन्यांमधील बॅक ऑफिसचे काम देखील करणे शक्य होणार आहे. मु‘य म्हणजे एखादा उमेदवार तंत्रज्ञानात अल्पशिक्षित असेल आणि भाषा समृद्ध असेल तर त्याला प्रथम प्राधान्य मिळते. जापान हा सुरक्षित देश आहे, अतिशय उदारमतवादी तसेच श्रमाला प्रतिष्ठा असणारा देश आहे. जापान सरकारतर्फे गुणवंतांना शिष्यवृत्तीची देखील सोय आहे व यासंदर्भातील माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारतीय युवकांनी भाषेचे शिक्षण घ्यावे आणि त्यातून देशाचा मान उंचावून आपले आणि आपल्या कुटुंबाचे राहणीमान उंचावण्यास मदत करावी असे आवाहनही मंदार सुगवेकर यांनी केले.