औरंगाबादच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक

    दिनांक :13-Jan-2021
|
- बसवर लावले संभाजीनगरचे फलक
तभा वृत्तसेवा
अचलपूर,
येत्या 26 जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबादचे ’छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा बस स्थानकात बुधवारी आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने बस स्थानक परिसरात खळबळ उडाली. बसवरील औरंगाबादचे फलक काढून त्यांनी संभाजीनगरचे फलक लावले.
 
 
mns_1  H x W: 0
 
राज्यभरात मनसेच्यावतीने औरंगाबाद शहराच्या नामांतराची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्याला आणखी बळ मिळावे म्हणून मनसेच्यावतीने परतवाडा बसस्थानक येथील चांदूर बाजार - औरंगाबाद बसचे फलक काढून ‘संभाजीनगर’चे फलक लावण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील, जिल्हा सचिव अक्षय काजे, प्रितेश अवघड, विजय पोटे, विवेक महल्ले, सचिन जिस्कार, सागर डांगे, दिलीप गुलरक, देवराव केदार, दिनेश पवार, आदित्य खुळे, अक्षय घुलक्षे अक्षय गुर्जर, वैभव कोरडे, चेतन चौधरी ,रुपेश शर्मा, रोशन धांडे ,गौरव अमझरे अभय गोवारे, पंकज पर्वतकर, पार्थ भुजबळ, मंगेश आवनकर उपस्थित होते.