शिवसेनेकडून मृतांच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत

    दिनांक :13-Jan-2021
|
-मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
भंडारा,
झालेली घटना जे दोषी असतील ते नक्कीच शिक्षा भोगतील. चौकशी अहवाल आल्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल गुन्हे दाखल होतील. शिवसेनेच्या वतीने प्रत्येक मृत बालकाच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचे राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 

g_1  H x W: 0 x 
आठ जानेवारीला घटना घडून गेल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या मंत्री आणि राजकीय नेत्यांची सत्र थांबताना दिसत नाही. आज राज्यपाल भगतसिंग कुशारी येऊन गेल्यानंतर दुपारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी इतर मंत्र्यांनी प्रमाणे चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करू असे सांगून टाकले.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तीन दिवसात अहवाल येईल असे वक्तव्य केले होते त्या संदर्भात मात्र शिंदे यांनी बोलण्याचे टाळले. विरोधकांच्या होत असलेल्या न्यायालयीन चौकशीचा संदर्भात विचारले असता समितीने केलेल्या चौकशीनंतर त्यासंदर्भात काय तो निर्णय होईल असेही शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या वतीने प्रत्येक मृत बालकाच्या कुटुंबाला एक लाखाची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार आ. नरेंद्र भोंडेकर, आमदार राजेंद्र कारेमोरे, बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी खासदार मधुकर कुकडे उपस्थित होते.