शुद्ध पाणी, स्वच्छ गाव

    दिनांक :13-Jan-2021
|
-रश्मी खेडिकर
पिंपळाचे झाड, त्यावर पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचा थवा, मारुतीचा पार अन त्यागाचा भगवा झेंडा, देवळात प्रकाशाची वाट दाखवणारी पणती, गावाच्या मध्यभागी विहीर, विहिरीला चार खिराड्या,  या गावाची तहान भागवणाऱ्या. गावभर गुराढोरांच्या गळ्यातील रुनझुन आणि गावाकडून झुळझुळ वाहणारी एखादी कृष्णामाई किंवा गोदामाय असं डोळ्यात साठवलेले गाव, किती छान वाटते हे सगळं ऐकायला वाचायला.
 
 
a _1  H x W: 0
(संग्रहित) 
पण, महाराष्ट्रभूमीत सध्या अस कुठेही पाहायला मिळत नाही. कवी अनिल, कवी बोरकर यांच्या सारख्या अनेक कवींनी अशा समृद्ध गावांना आपल्या कवितेच्या ओळीतून लोकांपर्यंत पोहोचवले. परंतु,  आज आम्हा नवकवीना असले दृश्य सहजरित्या दिसत नाही आणि या दृश्यांना व्यक्त करणारे शब्दही मिळत नाही. आपण नेहमी म्हणतो ना 'पाणी म्हणजे माणसाच जीवन, निसर्गाने दिलेला एक अमूल्य ठेवा' माणसाच्या डोक्यावर छप्पर आहे, ते आभाळाच आणि त्यामध्ये सामावले आहे ते पाणीच. मनुष्याच्या पायाखाली जमीन अन उदरात साचलय ते जलमय विश्व्.  निळेभोर आकाश अन निर्मळ भूमीतरीही माणसातच मन निर्मळ का नाही?  हा प्रश्न मला नेहमी पडतो.
 
 
a _1  H x W: 0
 (संग्रहित)  
 
आज निर्मळ मनाची माणसच निर्मळ पाण्याच्या शोधात भ्रमंती करतात. शिक्षणातून मनुष्य प्रगल्भ झाला, पण निर्मळता मात्र हरवून बसला. 'जल हेच जीवन हे' तत्व आम्ही तोंडी तोंडी वापरतो तेच पाणी निर्मळ असावा कारण देणाऱ्याने ते निर्मल दिले, मग मी ते का सांभाळू शकत नाही ?  हा प्रश्न मानवी मनाला पडला पाहिजे. परंतु, निर्मळता येते ती स्वच्छतेतून पण जेथे मनाच स्वच्छ नाही, तेथे गाव स्वच्छ तरी कशी होणार, 'मन करा रे निर्मळ' असे उपदेश संत महात्म्यांनी दिले आहे.  हातात झाडू खराटे अन टोपले घेऊन चार दिवसांसाठी गाव स्वच्छता ठेवता येते, परंतु आयुष्यभराची स्वच्छता आणि निर्मळ मन आतून येत असते, उगाच नव्हे गाडगेबाबांनी हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ केले आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातला मळ  स्वच्छ केला.
 

a _1  H x W: 0
 (संग्रहित)
 
माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकराला मी काय दिले, असा प्रश्न जर मला स्वर्गात चित्रगुप्ताने विचारला, तर मी एकच सांगेन  'माझ्या लेकराला मी शुद्ध पाण्याचा विचार आणि स्वच्छ गाव दिले. अशा या स्वच्छ  व सुंदर निर्मळ गावात माझ्या मुलाचा चार सवंगडी नक्कीच भेटणार त्यामध्ये असणारे पशुपक्षी हिरवीगार झाडे. आणि झुळझुळ वाहणारा वारा. कारण अस्वच्छेतून आम्ही नदी, नाले, विहिरी आणि भूगर्भातील पाणी मृत करत चाललो आहे.  माझ्या शरीरात धावणाऱ्या रक्तामध्ये एक जरी जिवाणू चुकीचा तयार झाला, तर त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर होतात. मग भूमातेचा गर्भातल्या पाण्यात आमच्या अस्वच्छतेमुळे हजारो जीवाणू तयार होतात. त्या माऊलीने तरी कोणाला हाक द्यावी.
 
'धरती मेरी माता है' असे दिमाखाने म्हणणारे आम्ही लोक आज तिचा जीव घ्यायला निघालो आहोत. अशुद्ध पाण्यातून माझ्या आरोग्यावर परिणाम होतात म्हणून शुद्ध पाण्याचा आग्रह आम्ही करतो. पण मुळात निसर्गानेच आम्हाला शुद्ध दिले आहे. मग ते अशुद्ध होणार नाही याची काळजी आम्ही घ्यायला नको का?  अशुद्धता ही नैसर्गिक नाही, जसा प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार होतो, ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान होते, तसेच शुद्धतेचा अभाव म्हणजे अशुद्धता होतो. मला सांगा डबके आणि नदी यात काही फरक आहे किंवा नाही नदीचा प्रवाह सर्वांना हवाहवासा वाटतो तर डबके मात्र जीवघेणी ठरतात म्हणून मला सांगावेसे वाटते की, विचार व स्वच्छता या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या गावातील लोक सात्विक वैज्ञानिक व पारदर्शक विचारांचे धनी आहेत.
 
ज्या गावात स्वच्छ पाणी व ग्राम स्वच्छता संकल्प पूर्णत्वाकडे गेलेला दिसेल तेथे तुम्हाला सारी हिरवळ दिसेल. पण ज्या गावातील लोक अविचारी आहेत त्या ठिकाणी साधं स्वच्छ पाणी सुद्धा नाही, तर ग्रामस्वच्छता तरी कुठून येणार. लाज मनुष्यात अस्वच्छतेचा पुरस्कार करण्यास भाग पाडते.  जेव्हा आपण ग्रामस्वच्छतेचा उपक्रम राबवतो. तेव्हा सहभाग म्हणून, बरेच लोक एकत्र येतात व हातात झाडू, फावडे, घमेले घेऊन स्वच्छता अभियान राबवतात. वृत्तपत्रात फोटो सुद्धा छापून घेतात.  काही तर सेल्फी काढून स्वतःच मिरवतात. पण दुसऱ्याच दिवशी परिस्थिती 'जैसे थे' असते.
 
a _1  H x W: 0
(संग्रहित)  
 
भारत डिजिटल इंडिया कडे वाटचाल करीत असताना गाव खेडे मात्र, अस्वच्छतेने त्रस्त आहेत. देशाचा वैज्ञानिक विकास झाला हे जितके खरे तितकेच गावांमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छ रस्ते, नदी, नाले अजूनही का दिसतात यावर लक्ष द्याला हवे,  आज सुंदर दिसण्यासाठी आपण इतक्या दूर ब्युटीपार्लर पर्यंत चालत जाऊ शकतो. पण स्वतःच्या घरचा कचरा फेकण्यासाठी दोन पाऊल स्वच्छतेसाठी पुढे जाऊ शकत नाही. ही आपल्या देशातील लोकांची मानसिकता आहे. आज माणूस म्हणून ते तत्त्व आम्हाला सांभाळायला पाहिजे ते आम्ही सांभाळत नाही. निसर्ग निसर्गाचं काम करतो, निसर्गानेच आम्हाला जन्माला घातले मग निसर्गाचा आम्ही एक घटक आहोत.  माझी जबाबदारी बनते की माझ्यात घटकांनी इतर घटकांचा संगोपन केले पाहिजे. आज आम्ही निसर्गाचा संगोपन करत नाही इतके आम्ही स्वार्थी झालो आहोत का? 
 
'पे बॅक टू नेचर' घेतले तस निसर्गाला परत करा पण आम्ही घेणे करी झालोय देणे करीची भावनात आमच्यामध्ये विकसित झाली नाही हे त्याच मुळे सगळे प्रश्न निर्माण होत आहे तेव्हा पाण्याची बचत करणे त्याचे संगोपन करणे त्याची गुणवत्ता सांभाळणे सोबतच गावाची स्वच्छता राखणे ही आज आपली जबाबदारी आहे.
- 74998 12458