दुसऱ्या सामन्यातही विदर्भ पराभूत

    दिनांक :13-Jan-2021
|
- सय्यद मुश्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धा
नागपूर, 
गोलंदाजांच्या अपयशी कामगिरीच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेतील दुसèया लढतीत विदर्भ संघाला सौराष्ट्र विरुद्ध देखील पराभव स्वीकारावा लागला असून सलग दुसरा पराभव विदर्भाच्या वाट्याला आला आहे.  इंदूर येथील होळकर मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसèया लढतीत नाणेफेक qजकून विदर्भाच्या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला फलंदाजीला आलेल्या एच देसाई आणि ए बारोटला संघासाठी चांगली सुरुवात करुन देण्यात अपयश आले. २.६ चेंडूवर देसाईला दर्शन नळकांडेने तंबूत धाडत विदर्भाला पहिले यश मिळवून दिले.
 
a _1  H x W: 0
 
त्यानंतर फलंदाजीला आलेला समर्थ व्यास पहिल्याच चेंडूवर यश ठाकूरचा बळी ठरल्याने १९ धावांवर दोन गडी सौराष्ट्र संघाने गमविले. परंतू त्यानंतर फलंदाजीला आलेल्या प्रेरक मंकडच्या साथीने बारोटने चौफेर फटकेबाजी करीत विदर्भाच्या गोलंदाजांचा अक्षरश: समाचार घेतला. आक्रमक खेळी करीत मंकडने आपले अर्धशतकही अवघ्या २० चेंडूत पूर्ण केले. त्याला बारोटने चांगली साथ दिली.
 
या जोडींचा चांगलाच जम बसला असतांना ९० धावसंख्येवर मंकडला फिरकीपटू अक्षय कर्णेवार याने माघारी धाडत तिसरा धक्का सौराष्ट्रला दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ए वासवडाच्या साथीने एका बाजूने चिवट फलंदाजी करणाèया बारोटने संघाचा धावफलक वेगाने हलता ठेवत संघाचा डाव १५.५ षटकांतच दोनशेच्या जवळपास पोहचविला. संघाची धावसंख्या १९० झाली असतांना यश ठाकूरने बारोटला यष्टीमागे झेलबाद करीत चालते केले. परंतू तोपर्यंत सौराष्ट्राने विजयासाठी आवश्यक असलेली धावसंख्या धावफलकावर लावण्यात यश मिळविले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पार्थ चौहानने देखील ९ चेंडूत १९ धावा उभारत निर्धारीत २० षटकांत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचविली. गोलंदाजीत विदर्भाचा यशस्वी गोलंदाज दर्शन नळकांडेने ३२ धावा देत ४ गडी तर यश ठाकूरने दोन गडी बाद केले.
 
२० षटकांत २३३ एवढ्या मोठ्या विजयाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला उतरलेल्य विदर्भ संघाची सुुरुवात काहीशी आक्रमकच झाली. परंतू फलंदाजीत शेवटपर्यंत सातत्य राखण्यात अपयश आले. सलामीला आलेल्या जितेश शर्मा आणि अथर्व तायडेने संघासाठी वेगाने धावा जोडणे सुरु केले. परंतू ३.५ षटकात चाचपडत खेळणाèया तायडेला मंकडने तंबूत धाडत विदर्भाला पहिला धक्का दिला. एका बाजूने शर्माने संघाचा धावफलक हलता ठेवला. परंतू ७२ धावसंख्येवर मंकडने परत एका सलामीला आलेल्या शर्माला झेलबाद करीत विदर्भाला दुसरा धक्का दिला.
 
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऋषभ राठोलला देखील लगेचच मंकडने आपल्या जाळ्यात फसवित माघारी धाडले. यामुळे तिसरा धक्का विदर्भाला बसला. यानंतर सिद्धेश वाठ, अपूर्व वानखेडे, अक्षय कर्णवार यांनी काहीसा सावध खेळ करीत संघासाठी धावा जोडण्याचा प्रयत्न केला. परंतू हे सर्व खेळाडू ठराविक अंतराने माघारी परतल्याने विदर्भाचा डाव १७.२ षटकांत केवळ १५४ धावांवरच संपुष्टात आला. फलंदाजीत सर्वाधिक ४३ धावा जितेश शर्माने तर प्रत्येकी २१ धावांचे योगदान सिद्धेश वाठ आणि अक्षय कर्णेवारने दिले. गोलंदाजीत सर्वाधिक पाच गडी चेतन साकारियाने तर प्रेरक मंकडने चार गडी तंबूत धाडत सौराष्ट्राला विजयी करण्यात महत्वपुर्ण भुमिका बजाविली.

संक्षिप्त धावफलक -
सौराष्ट्र- २० षटकांत ७ बाद २३३.
ए बारोट ९३, प्रेरक मंकड- ५९.
गोलंदाजी- दर्शन नळकांडे- ४-३२-४, यश ठाकूर- ४-४७-२.
विदर्भ- १७.२ षटकांत १५४.
जितेश शर्मा ४३, सिद्धेश वाठ २१, अक्षय कर्णेवार २१.
गोलंदाजी- चेतन सकारिया- ४-११-५, प्रेरक मंकड- ४-४८-४.
------------------------